Posts

Showing posts from July, 2026

धडक पक्ष्यांची

  ‘झुंजूमुंजू झालं . पूर्वेला तांबडं फुटलं . झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले . चिमण्या उठल्या , कावळे उठले , कबुतरं उठली , पोपट उठले . पंख फडफडवीत अंग मोकळे केले . चोचा उघडीत चिवचिवाट , किलबिलाट केला . दोन - पाच मिनिटांनी एका पाठोपाठ एकाने आकाशात झेप घेतली . सगळीकडे एकच कल्लोळ झाला . आकाशात पक्ष्यांचे थवेच्या थवे उडू लागले .’ इथपर्यंत ठीक आहे . आम्ही क्षणभर विचार केला , ह्या पक्ष्यांच्या वर्णनात मानवी अंश घुसला तर काय होईल ? वर्णन पुढे चालू .... ‘ … पक्ष्यांचे थवेच्या थवे उडू लागले . पण तेवढ्यात कावळा उडत असलेल्या वाटेने कबुतराला जायचे होते . कावळा शहाणा होता . त्याने कबुतराला कावकाव अशा आवाजात थांबथांब म्हटले . पण कबुतराने ऐकले नाही . सरळ कावळ्याला हवेतच धडक मारली . कावळा क्षणभर कोलमडला , कसातरी सावरला . तिकडे साळुंकी बसलेल्या तारेवरच पोपटाला बसायचे होते . त्याने मागनं येऊन साळुंकीला तारेवरून ढकलून दिले . साळुंकी पाच - दहा फूट खाली...

सर्टिफिकेट

  मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो . आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘ इयत्ता तिसरी ब ’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले . आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट काढले आणि कौतुकाने दाखवले . पाहिले तर शाळेच्या कुठल्यातरी छोट्या सहलीमध्ये भाग घेतल्याबद्दलचे होते ते . मी चाट पडलो . नुसतं सहलीला आल्याबद्दल सर्टिफिकेट ! तेही दुसरी तिसरीच्या मुलांना ? पण काहीही म्हणा , आजकाल सर्टिफिकेटचा अक्षरशः बाजार झालाय ! काही सन्माननीय अपवाद सोडले तर उठेल तो , उठेल त्याला सर्टिफिकेट देत सुटतोय . कुठलीतरी छोटी - मोठी स्पर्धा किंवा कार्यक्रम ठेवायचा . जिंकलेल्यांना तर सर्टिफिकेट द्यायचेच , पण न जिंकलेल्यांनाही , परीक्षकांना , आयोजकांना , प्रेक्षकांना सगळ्यांना सर्टिफिकेट् ‌ स ! कशाकरता आम्हाला देता , असं कोणी विचारलं तर ‘ सहभागाबद्दल ’ असं उत्तर मिळतं . बरं , ते सर्टिफिकेट् ‌ स असे एकदम साधे नसतात , छान ग्लॉसी फोटो पेपरवर , रंगीबेरंगी छान डिझाईनचे , खाली चार पाच सह्यावाले असतात . ठेववत नाही आणि फेकवतही नाह...