Posts

Showing posts from October, 2020

काना मात्रा वेलांटी उकार

  काना मात्रा वेलांटी उकार - © सुनील भातंब्रेकर      जगात जशा शेकडो बोलीभाषा आहेत तशाच शेकडो लिप्या पण आहेत . त्यात आपल्या   देवनागरी पासून ते लॅटिन रोमन व्हाया मंडेरिन , कांजी , काताकाना , हिरागाना , अरेबिक अशा असंख्य लिप्या आपल्याला ज्ञात आहेत . कुठेतरी , केव्हातरी आपल्या डोळ्याखालून त्या जात असतात .      पण शेवटी ‘ आपला तो बाब्या ‘ च ! म्हणून मला आपली देवनागरी लिपीच सहाजिक प्रिय आहे . परंतु ही लिपी नुसती आपली आहे म्हणून प्रिय नाही तर त्या लिपीच्या सजावटीमुळे सौंदर्यामुळे माझ्या डोळ्यांना ती सुखावते ! ह्या लिपीच्या सजावटीचे प्रमुख दागिने म्हणजे त्या लिपीतले काना , मात्रा , वेलांटी , उकार वगैरे स्वरांश चिन्हे ! थोडी चित्रकलेची , अक्षर - लेखनाची आवड असणाऱ्यांना विचारून पहा या स्वरांशामुळे त्यांच्या प्रतिभेला केवढी आव्हाने दिली आहेत !     त्यातला ‘ काना ’ हा सरळसोट दोन कानावाला शब्द असला तरी ट , ठ , ड , ढ , र ,  ह , ळ सारख्या   अक्षर...