Posts

धडक पक्ष्यांची

  ‘झुंजूमुंजू झालं . पूर्वेला तांबडं फुटलं . झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले . चिमण्या उठल्या , कावळे उठले , कबुतरं उठली , पोपट उठले . पंख फडफडवीत अंग मोकळे केले . चोचा उघडीत चिवचिवाट , किलबिलाट केला . दोन - पाच मिनिटांनी एका पाठोपाठ एकाने आकाशात झेप घेतली . सगळीकडे एकच कल्लोळ झाला . आकाशात पक्ष्यांचे थवेच्या थवे उडू लागले .’ इथपर्यंत ठीक आहे . आम्ही क्षणभर विचार केला , ह्या पक्ष्यांच्या वर्णनात मानवी अंश घुसला तर काय होईल ? वर्णन पुढे चालू .... ‘ … पक्ष्यांचे थवेच्या थवे उडू लागले . पण तेवढ्यात कावळा उडत असलेल्या वाटेने कबुतराला जायचे होते . कावळा शहाणा होता . त्याने कबुतराला कावकाव अशा आवाजात थांबथांब म्हटले . पण कबुतराने ऐकले नाही . सरळ कावळ्याला हवेतच धडक मारली . कावळा क्षणभर कोलमडला , कसातरी सावरला . तिकडे साळुंकी बसलेल्या तारेवरच पोपटाला बसायचे होते . त्याने मागनं येऊन साळुंकीला तारेवरून ढकलून दिले . साळुंकी पाच - दहा फूट खाली...

सर्टिफिकेट

  मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो . आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘ इयत्ता तिसरी ब ’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले . आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट काढले आणि कौतुकाने दाखवले . पाहिले तर शाळेच्या कुठल्यातरी छोट्या सहलीमध्ये भाग घेतल्याबद्दलचे होते ते . मी चाट पडलो . नुसतं सहलीला आल्याबद्दल सर्टिफिकेट ! तेही दुसरी तिसरीच्या मुलांना ? पण काहीही म्हणा , आजकाल सर्टिफिकेटचा अक्षरशः बाजार झालाय ! काही सन्माननीय अपवाद सोडले तर उठेल तो , उठेल त्याला सर्टिफिकेट देत सुटतोय . कुठलीतरी छोटी - मोठी स्पर्धा किंवा कार्यक्रम ठेवायचा . जिंकलेल्यांना तर सर्टिफिकेट द्यायचेच , पण न जिंकलेल्यांनाही , परीक्षकांना , आयोजकांना , प्रेक्षकांना सगळ्यांना सर्टिफिकेट् ‌ स ! कशाकरता आम्हाला देता , असं कोणी विचारलं तर ‘ सहभागाबद्दल ’ असं उत्तर मिळतं . बरं , ते सर्टिफिकेट् ‌ स असे एकदम साधे नसतात , छान ग्लॉसी फोटो पेपरवर , रंगीबेरंगी छान डिझाईनचे , खाली चार पाच सह्यावाले असतात . ठेववत नाही आणि फेकवतही नाह...

रंग जांभळा

  रंग जांभळा © सुनील भातंब्रेकर रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल , काळा , निळा , थोडा गुलाबी , हलकासा किरमिजी , तपकिरी अशा बऱ्याच रंगांचे मिश्रण केल्यानंतर जसे एखादे स्वयंपाकघरातले व्यंजन बनावे , तसा हा जांभळा रंग बनला आहे ; जणू विविध प्रकारचे मसाले , हळद , तिखट , नैसर्गिक रंग टाकून एक अत्यंत सुंदर चविष्ट पदार्थ बनवावा! अतिशय संवेदनशील , भावनोत्कट , कवी मनाच्या व खूप सर्जनशील वृत्तीच्या लोकांचा हा आवडता रंग असतो , तो त्यामुळे! जांभळा रंग माणसामाणसातले अंतर कमी करतो. भिंतीला हा रंग असेल तर त्या खोलीत बसून बोलणाऱ्याला अंतरीचे गुह्य सांगावेसे वाटते. ही त्या रंगाची जादू आहे. हृदय सर्वांनी बघितलंय , त्याचा रंगही सगळ्यांना माहिती आहे. लाल , गुलाबी रंगाचे ते मिश्रण असते. पण अंतःकरण कोणीच पाहिलं नाही. कारण ती एक भावना आहे. म्हणून मला वाटते की , उद्या जर अंतःकरणाचा रंग कुठला असा प्रश्न पडला तर बिनधास्तपणे सांगा - जांभळा! दुसरा असूच शकत नाही! ह्या जांभळ्याची बातच न्यारी असते. चार लोका...

रंग गुलाबी

  रंग गुलाबी © सुनील भातंब्रेकर फुलांमध्ये जसं गुलाबाच्या फुलाला आपल्या हृदयात खास जागा आहे , तसं गुलाबी रंगाला रंगांच्या अनोख्या दुनियेत प्रत्येकाच्या मनामनांत अत्यंत अलवार असे   स्थान आहे. याचं कारण गुलाबी रंगांची निर्मितीच मुळे प्रेमभावनेतून तयार झाली आहे. प्रेमाच्या अनंत छटांप्रमाणे गुलाबी रंगाच्याही अनंत छटा आहेत. पण त्या सर्व छटा प्रेमामधील सूक्ष्म बारकावे व अवस्था सांगणाऱ्या आहेत.   हे प्रेम केवळ प्रियकर-प्रेयसीचे प्रेम नसून आई- मुल , भावंडं , मित्र , प्राणी ह्या सर्वांना एकमेकांविषयी वाटणारे असे सर्वसमावेशक प्रेम आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे गुलाबी रंगांचा प्रभाव म्हणजे इतर सर्व दुष्टता , , क्रौर्य , नैराश्य , भीती , सूडत्व अशा सर्व वाईट भावनांच्या रंगांचा अभाव! म्हणून हा रंग अत्यंत नाजूक आहे , मुलायम आहे व निरपेक्ष भावनेने प्रेम करणारा रंग आहे. गुलाबी रंगाने अतिशय झुळझुळीत , मऊशार , पिसांगत हलकी , कोमल अशी गुलाबी वस्त्रं परिधान केली आहेत. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचे मधाळ स्मित आहे.   कपाळावर , खांद्यावर पातळ कुरळे केस रुळत आहेत. डोळ्यांत फक्...

रंग निळा

  रंग निळा © सुनील भातंब्रेकर निळसर शुभ्र चंद्रावर प्रथम पाऊल टाकल्यावर नील (!) आर्मस्ट्राँगने जेव्हा पृथ्वीकडे पाहिले असणार तेव्हा पृथ्वीचा निळा रंग पाहून त्याचे डोळे नक्की चमकले असणार. निळ्या रंगाचा तो अवकाश व्यापून टाकणारा सोहळा निळ्या रंगाची अथांगता दर्शवणारा ठरला असावा. ‘ तानापिहिनिपाजा ’ मधला हा माझा सगळ्यात आवडता रंग! देवांचा देव महादेवांचा हा रंग. नजरेत न मावणारा. ह्या रंगाची डोळ्यात न मावणारी अथांगता बघायची असेल तर विमानातून दिवसा उजेडी विमान उंच गेल्यावर खिडकीतून बघावे. त्या निळाईत न्हाऊन जातो आपण. क्षणभर ते विमान , उंची , आकाश सगळे विसरा आणि स्वतःला त्या निळाईत झोकून द्या. समाधीच शेवटच्या तुर्यावस्थेत जाऊन आत्म्याचे परमात्म्याशी संयोग होऊन एक प्रकारची उन्मनी अवस्था प्राप्त होते. दिव्य प्रकाश - जो समाधिवस्थेतच दिसतो - हा नक्कीच निळ्या रंगाचा असणार. अथांगता , गहनता ह्या निळ्या रंगाच्या वैशिष्ट्यामुळे आकाशाप्रमाणेच समुद्रानेही निळाई पांघरलेली असते. निळा रंग सहा-साडेसहा फूट उंचीच्या बलदंड शरीरयष्टीच्या , आपली शुभ्र दंतपक्ती दाखवत प्रसन्नपणे हसणाऱ्या , आपले लांबसडक ...

रंग लाल

  रंग लाल © सुनील भातंब्रेकर जवळपास प्रत्येकाने रंगासाठी त्या रंगाच्या   पुढे एक रंग विशेषण लावतात , उदा. पिवळाधमक , हिरवाजर्द , निळंशार , काळाकुट्ट वगैरे. त्यात ‘ लाल ’ च्या पुढे ‘ भडक ’ वापरतात. म्हणजे ह्या लाल रंगाचा जन्मच मुळी एखादी गोष्ट ‘ भडक ’ करण्यासाठी झालाय असे वाटते. रंग नसणे म्हणजे काळा किंवा पांढरा असणे आणि रंग असणे ह्याची परिसीमा म्हणजे लाल रंग. रंगीतपणामध्ये रँक नं. १ म्हणजे लाल रंग! कुठलीही तडजोड न स्वीकारता केलेला निर्भेळ रंगाच्या व्याख्येत बसणारा रंग म्हणजे लाल रंग! आपले जीवनदायिनी रक्तच जर लाल रंगाचे आहे , त्यापुढे सगळे रंग फिकेच वाटणार! लाल रंग म्हटले की , माझ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी , स्वराज्यासाठी , आपल्या दोन्ही हातात तळपत्या तलवारी घेऊन त्वेषाने लढणारे , शरीरावरच्या असंख्य जखमांमुळे रक्तबंबाळ झालेले , पावनखिंडीत स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे उभे राहातात. हा खरा मूर्तिमंत लाल रंग! सळसळते रक्त वाहत असलेले तारुण्य , त्याग , उत्साह! नखशिखांत पांढरे कपडे घाला आणि कपाळावर फक्त एक लाल रंगाचे गंध किंवा टिळा लावा ...